⭐सिल्व्हसिटी मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटलच्या अत्याधुनिक सुविधायुक्त नूतन आय.सी.यु. चे भव्य उद्घाटन सोहळा ⭐
खामगाव :-
(शिवशंकर कुटे)
बुलडाणा जिल्ह्याची ओळख एक आर्थिक, शैक्षणिक व वैद्यकीय दृष्ट्या मागासलेला जिल्हा अशीच होती. कुठल्याही प्रकारच्या आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्या कारणाने जिल्ह्यातील रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी नजिकच्या मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागत असे. यामध्ये बरेचदा रस्त्यातच रुग्ण अत्यवस्थ होऊन दगावल्या जात असे. ही बाब लक्षात घेऊन खामगांव येथील ११ नामांकित वैद्यकीय तज्ञांनी एकत्र येऊन आपल्या खामगांव शहरात जागतिक स्तरावरील अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा व उपचार जनतेस कशाप्रकारे उपलब्ध करुन दिल्या जातील यासाठी मंथन केले. यामध्ये खामगांव व परिसरातील विविध वैद्यकीय शाखांमधील २१ तज्ञांची साथ त्यांना लाभली व अशाप्रकारे त्यातूनच सिल्व्हसिटी मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल, क्रिटीकल केअर व ट्रॉमा सेंटरची गोकुल नगर, जलंब रोड, खामगांव येथे १० वर्षापूर्वी सुरुवात झाली. अत्यंत जटील व किचकट हृदयरोग/हार्ट अटॅक, उच्च व कमी रक्तदाब असलेले रुग्णांचे उपचारासाठी अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असा अतिदक्षता विभाग (आयसीयु), किडणीचे आजाराने ग्रासलेले रुग्ण उपचारासाठी डायलीसीस युनिट, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया व लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी सुसज असे ऑपरेशन थिएटर, एनआयसीयु व बालरोग विभाग, अपघात ग्रस्त रुग्णांसाठी अस्थिरोग विभाग, नेत्रचिकित्सा, दंतचिकित्सा, फिजीओथेरपी, सर्व प्रकारच्या रक्त व लघवी तपासणीसाठी अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज पॅथॉलॉजी विभाग, ब्लड स्टोरेज युनिट, हृदयरोर्गीसाठी रही इको व स्ट्रेस टेस्ट तपासणी, सर्व प्रकारचे एक्स-रे व सोनोग्राफी तपासणी सुविधा, जागतिक स्तरावरील नामांकित सिमेन्स कंपनीची १.५ टेस्ला एमआरआय मशीन व कमी वेळेत अचुक निदान करण्यासाठी ९६ स्लाईस सिटी स्कॅन मशीन, २४ तास मेडीकल स्टोअर्सची सुविधा सोबतच २४ तास निरंतर अत्यावश्यक सेवा व एमडी डॉक्टर्स ची उपलब्धता, प्रशिक्षित नसींग स्टाफ, आरोग्यदायी वातावरण, स्वच्छता व मनमिळावू कर्मचारी वृंद यामुळे काही दिवसातच सिल्व्हरसिटी हॉस्पिटल रुग्ण व त्यांचे नातेवाईकांसाठी पहिल्या पसंतीचे उपचार केंद्र म्हणून नावारुपास आले. मल्टीसिस्टीम ऑर्गन फेल्युअर, गुडघ्याची कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया, किचकट प्रसुतीशस्त्रक्रिया, मेंदूविकार उपचार व मेंदु शस्त्रक्रिया, पोटाच्या जटील शस्त्रक्रिया, किडणी शस्त्रक्रिया, अत्यंत गंभीर हार्ट अटॅक, पॅरालेसीस, जळीत रुग्ण, बिकट विषबाधा, सर्पदंश, पाण्यात बुडून गंभीर झालेले इ. प्रकारचे कित्येक रुग्णांवर यशस्वी उपचार होऊन त्यांचा जीव वाचू शकला. अशा प्रकारचे रुग्ण खामगांव मध्ये उपचार घेऊन ठिक होणे हे केवळ अशक्य होते व बऱ्याच रुग्णांना मोठ्या शहरापर्यंत जात असतांना आपला जीवही गमवावा लागत असे. परंतु सिल्व्हरसिटी हॉस्पिटलमुळे अशा अत्यावस्थ रुग्णांना नवसंजीवनीच प्राप्त झाली. जागतिक स्तरावरील
अत्याधुनिक उपकरणे व उत्कृष्ठ उपचार पध्दती अत्यंत माफक दरात एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्यामुळे हे शक्य झाले आहे. मागील १० वर्षात अत्यंत अत्यावस्थ व किचकट रुग्णांवर आयसीयु मध्ये उच्च दर्जाचे उपचार करतांना व वाढत्या रुग्णसंख्येमुळे नवीन आधुनिक वैद्यकीय उपकरणे व रुग्णांच्या दैनंदिन प्रगतीवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे अतिदक्षता विभागाची गरज भासू लागली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार आवश्यक असलेल्या सर्व बाबींचा विचार करून सर्व अत्याधुनिक सुविधेसह नूतन आयसीयु चा उद्घाटन व समर्पण सोहळा शनिवार दि. १७ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. अॅड. श्री. आकाशदादा फुंडकर यांच्या शुभहस्ते व नगर परिषद खामगांवच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा मा. सौ. अपर्णाताई सागर फुंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी ४ वा. आयोजित केला आहे. ही सुविधा संपूर्ण बुलढाणा जिल्हा तसेच खामगांव तालुका व परिसरातील जनतेला एक वरदान ठरणार आहे असा विश्वास सिल्व्हरसिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल खामगांव चे अध्यक्ष डॉ. अशोक बावस्कर, व्यवस्थापकीय संचालक डॉ. पंकज मंत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पराग महाजन, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गौरव लड्डा, संचालक डॉ. प्रशांत कावडकर, डॉ. भगतसिंग राजपुत, डॉ. निलेश टिबडेवाल, डॉ. गणेश महाले, डॉ. मनिष अग्रवाल, डॉ. गौरव गोयनका व डॉ. आनंद राठी यांनी सिल्व्हरसिटी हॉस्पिटलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली. ☀️☀️☀️☀️☀️🌟महाराष्ट्र रत्न न्यूज 🌟🌟🌟🌟🌟🎤🎤🎤🎤🎤जाहिरात व बातम्या करीता संपर्क. ⭐⭐⭐⭐⭐✍️मुख्य संपादक :-पद्माकर धुरंधर ⭐⭐⭐⭐⭐📲7397988070

Post a Comment
0 Comments