Type Here to Get Search Results !

☀️ रोटी ते कालवड रस्ता डांबरीकरण करा अन्यथा 25 जानेवारी मनसे करणार आमरण उपोषण☀️☀️

 ☀️रोटी ते कालवड रस्ता डांबरीकरण करा अन्यथा २५ जानेवारी रोजी मनसे करणार आमरण उपोषण☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️


*नांदुरा :*☀️☀️☀️☀️(राहुल चोपडे) ☀️☀️☀️☀️☀️☀️☀️नांदुरा तालुक्यातील भोटा ते रोटी सुमारे ०२ किमी रस्ता तसेच भोटा ते कालवड ०३ किमी रस्ता सुस्थितीत नसून सदर रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. सदर रस्त्याअभावी खामगाव - शेगाव आगाराच्या बसेस देखील बंद पडल्या असुन, यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच यामधील रोटी ते भोटा सदर रस्ता तर देशाला स्वातंत्र्य मिळून पाऊण शतक पुर्ण होऊही पुर्णत्वास गेलेला नाही. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची आग्रही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मनसे विद्यार्थी सेना या रस्त्याठी सतत पाठपुरावा देखील करत आहे. २८ सप्टेंबर २०२२ रोजी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग मलकापूर येथे सदर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे यासाठी उपोषण देखिल केले होते. लेखी आश्वासन मिळाल्यानंतर सदर उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले होते. मात्र रस्ता डांबरीकरण न झाल्याने सदर रस्त्यावर मनसेने दिनांक ११ आॅक्टोबर २०२४ रोजी लाॅलीपाॅप वाटून अनोखे आंदोलन देखील केले होते. तेव्हा देखील लेखी आश्वासनाने सदर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते. परंतु सदर रस्ता अद्यापही पुर्णत्वास गेलेला नसल्याने आज दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग मलकापूर यांना निवेदन देण्यात आले. 

सदर निवेदनावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपजिल्हाध्यक्ष शिवचरण पारस्कर पाटील, मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हा सचिव राहुल चोपडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नांदुरा तालुकाध्यक्ष भागवत उगले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मलकापूर तालुकाध्यक्ष पंकज पाटील यांच्या सह्या आहेत.

सदर निवेदनाची दखल न घेतल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्यात येईल. असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे .☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️ महाराष्ट्र रत्न न्यूज☀️☀️☀️☀️☀️☀️☀️🎤🎤🎤🎤✍️ जाहिरात व बातम्या करिता संपर्क ☀️☀️☀️✍️ मुख्य संपादक☀️☀️☀️☀️☀️☀️☀️✍️ पद्माकर धुरंधर ☀️☀️☀️☀️☀️📲7397988080☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️


☀️

Post a Comment

0 Comments