☀️कठीण परिस्थितीतून यशाची झेप; खामगावच्या निकिताची CRPF मध्ये निवड. ☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️खामगाव:-शिवशंकर कुटे
खामगाव शहरातील बाळापूर फैल भागात राहणारी निकिता सुनीता दिलीप अवसरमोल हिने कठीण परिस्थितीवर मात करत SSC GD परीक्षेत यश मिळवत केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये निवड मिळवली आहे. तिच्या या यशामुळे खामगाव शहरासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
निकिताच्या जीवनात मोठा आघात झाला होता. अवघ्या एक वर्षापूर्वी तिच्या वडिलांचे निधन झाले, त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आईवर आणि स्वतः निकितावर येऊन पडली. आई गृहिणी असून आर्थिक व मानसिक अडचणी असूनही निकिताने हार मानली नाही.
या प्रतिकूल परिस्थितीतही निकिताने आपले शिक्षण थांबवले नाही. तिने B.Com चे शिक्षण पूर्ण केले आणि त्याचबरोबर CRPF साठी दिवस-रात्र मेहनत घेत तयारी सुरू ठेवली. अभ्यास, शारीरिक सराव, मानसिक तयारी यासाठी तिने स्वतःवर कठोर शिस्त लावली होती.
नागपूर येथे झालेल्या SSC GD परीक्षेत निकिताने उत्कृष्ट कामगिरी करत यश मिळवले आणि CRPF मध्ये तिची अंतिम निवड झाली. हे यश केवळ तिचे वैयक्तिक नाही, तर अनेक मुलींसाठी आणि संघर्ष करणाऱ्या युवकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. निकिताच्या या यशामागे तिची चिकाटी, आत्मविश्वास आणि कधीही न हार मानण्याची वृत्ती कारणीभूत ठरली आहे. वडिलांच्या निधनानंतर आलेल्या अडचणी, घरातील जबाबदाऱ्या आणि आर्थिक मर्यादा असूनही तिने आपले स्वप्न जपले आणि ते सत्यात उतरवले. निकिताच्या निवडीबद्दल खामगाव शहरातील नागरिक, नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील युवकांनी तिचे अभिनंदन केले आहे. अनेकांनी तिच्या घरी जाऊन शुभेच्छा दिल्या असून सोशल मीडियावरही तिच्या यशाचे कौतुक होत आहे.
निकिताची ही यशोगाथा सांगते की, परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, मेहनत आणि विश्वास असेल तर यश नक्की मिळते. तिच्या या यशामुळे खामगाव शहराच्या नावात आणखी एक अभिमानाची भर पडली आहे.☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️ महाराष्ट्र रत्न न्यूज ☀️☀️☀️ ☀️☀️🎤🎤🎤जाहिरात व बातम्या करिता संपर्क ☀️☀️☀️☀️☀️☀️☀️✍️ मुख्य संपादक:- पद्माकर धुरंधर ☀️☀️☀️☀️☀️☀️📲7397988080☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️

Post a Comment
0 Comments