Type Here to Get Search Results !

💥💥 युग धर्म पब्लिक स्कूल खामगाव तर्फे महामानव डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांना अभिवादन💥💥

 *💥युगधर्म पब्लिक स्कूल खामगाव तर्फे महामानव डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांना 🙏🏼अभिवादन*



खामगाव

(शिवशंकर कुटे)

सूर्योदय एज्युकेशन सोसायटी, खामगाव यांच्या विद्यमाने संचालित युगधर्म पब्लिक स्कूल, खामगाव येथे महामानव डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रम अत्यंत गौरवपूर्ण वातावरणात पार पडला.


विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर मनोगत व्यक्त करत त्यांच्या शिक्षणप्रेम, संघर्षमय वाटचाल आणि समाजउद्धारातील योगदानाचे प्रभावीपणे वर्णन केले.


कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गोपालजी अग्रवाल यांनी बाबासाहेबांनी समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या त्यागांची माहिती देत विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे मार्गदर्शन केले.


श्री तायडे सर यांनी त्यांनी बौद्ध धर्म का आणि कसा स्वीकारला याबद्दल सांगत बौद्ध धम्मातील शांतता, करुणा आणि प्रज्ञेचे महत्त्व स्पष्ट केले.


कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य श्री अनिरुद्ध आवचार यांच्या नेतृत्वाखाली बौद्ध वंदना तसेच १५ मिनिटांची मौन वंदना घेण्यात आली, ज्याने सभागृहात शांततेचे वातावरण निर्माण झाले.


विद्यार्थी, शिक्षक आणि उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.


💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥

Post a Comment

0 Comments