Type Here to Get Search Results !

विकासाच्या साठी खामगाव नगर परिषदेमध्ये सर्वसामान्य चा उमेदवार नगराध्यक्ष म्हणून बसवा!

मतदारांना जाहीर आवाहन 


मी किशोर बाबासाहेब भोसले तसेच माझी पत्नी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ स्मिता किशोर भोसले  आमचा सर्वप्रथम समस्त शहरवासीयांना  मतदार बंधूंना आदरपूर्वक सप्रेम नमस्कार आम्ही आपणा समोर विनंतीपूर्वक निवेदन सादर करत आहे की आम्हीआपल्या खामगाव शहराच्या मूलभूत सुविधा सोडवण्यासाठी  नियमित आरोग्य सेवा व पाणी पुरवठा सेवा देण्यासाठी न प शैक्षणिक दर्जा ज्यातून विद्यार्थ्यांचा शारीरिक मानसिक बौद्धिक सर्वांगीण विकास साधण्यासाठी शहरात सर्व परिसरात स्ट्रीट लाईट तसेच नियमित नाल्या नाले सफाई साठी बेरोजगार झालेल्याना हक्काची जागा त्यांच्या रोजगारासाठी उपलब्ध करून देणार तसेच मूलभूत सुविधा सहवासीयांना देण्यासाठी स्वच्छ व सुंदर खामगाव शहर करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत याकरिता आपणास आमची या निवेदनाद्वारे नम्र विनंती आम्हाला आपले अमूल्य आशीर्वाद मतदान करू आघाडीच्या नगराध्यक्ष व समस्त नगरसेवकांना विजय करा विशेष म्हणजे आम्हाला या निवडणुकीच्या प्रचार दरम्यान आपल्या सर्वांच्या कडून प्रचंड प्रतिसाद व भरभरून प्रेमरूपीआशीर्वाद  आम्हाला मिळत आहे ही आमच्यासाठी तर सौभाग्याची गोष्ट आहे  आपल्या प्रेम रुपी आशीर्वादाने आमचे मन भरून आले आहे आपण आपला जो मोठा विश्वास आमच्यावर टाकला आहे हा विश्वासच हीच आमची खरी ताकद आहे . आपण टाकलेला विश्वास आम्ही सार्थक करणार व आपल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आपल्या विश्वासाने आशीर्वाद रुपी मताने सर्वांच्या सहकार्यानेच आपण आपल्या समस्त शहराचा सर्वांगीण विकास करणार आहे सदैव स्वच्छ सुंदर शहर आपले याची निर्मिती करणार आम्ही या निवेदनाद्वारे आपणास वचन देतो आम्ही सदैव पाच वर्ष सातत्याने आपल्या सेवेत राहून निरंतर आपल्या शहराची सेवा करणार 

आम्ही आपले हक्काचे

 नगराध्यक्षपदाच्या उमेदवार

सौ स्मिता किशोर आप्पा भोसले 

किशोर बाबासाहेब भोसले यांनी कळविले आहे 

Post a Comment

0 Comments