*लोकशाही मजबूत करण्यासाठी सिद्धार्थ क्रीडा मंडळ, जुना फैल चे पाऊल* – संविधान सापशिडी उपक्रमाला भरभरूनप्रतिसाद*
खामगाव : (शिवशंकर कुटे ) 💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥 "खेळ खेळूया – संविधान समजूया" या घोषणेनुसार संविधान जागर अभियानांतर्गत नव संकल्प फाउंडेशन आणि सिद्धार्थ क्रीडा मंडळ, जुना फैल,छ.शिवाजी नगर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ७ डिसेंबर रोजी बुद्ध विहार येथे संविधान सापशिडीचा आणि संविधान जागरुकता कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.नव संकल्प फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष तसेच सिद्धार्थ क्रीडा मंडळाचे सक्रिय सदस्य संतोष साळुंके यांच्या पुढाकारातून हा अर्थपूर्ण आणि जनजागृती करणारा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. संविधानातील मूलभूत अधिकार, कर्तव्ये, मूल्ये आणि सामाजिक बांधिलकी यांसारख्या विविध विषयांवर सहभागी नागरिकांशी संवाद साधण्यात आला.
या सत्राचे मार्गदर्शन व संयोजन फाउंडेशनचे प्रवक्ता आनंद लोखंडे, वैष्णवी गोलाईत आणि कोमल तायडे,यश पैठणकर यांनी केले. संवादात्मक पद्धतीने, खेळांच्या माध्यमातून आणि उदाहरणांसह संविधान समजावून सांगण्यात आले.या वेळी नव संकल्प फाउंडेशनचे आणि सिद्धार्थ क्रीडा मंडळाचे पदाधिकारी आकाश सोनाने, प्रवीण भाऊ कदम, सुनील खंडारे, सोमू सोनोने, संतोष साळुंके, साहिल सोनोने, विलास मोरे, यश लोंडे तसेच परिसरातील महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचा शेवट संविधानाच्या प्रास्ताविक वाचनाने करण्यात आला, ज्यामुळे एकता, बंधुता आणि संविधान मूल्यांप्रती निष्ठा अधोरेखित झाली. 💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟

Post a Comment
0 Comments