Type Here to Get Search Results !

⭐ युग धर्मा पब्लिक स्कूल खामगाव तर्फे अजिंठा वेरूळ शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न ⭐

 🌟🌟युगधर्मा पब्लिक स्कूल खामगाव तर्फे अजिंठा–वेरूळ शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न🌟☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️                                                                          खामगाव. (शिवशंकर कुटे)


युगधर्मा पब्लिक स्कूल खामगाव च्या वतीने विद्यार्थ्यांसाठी अजिंठा–वेरूळ या ऐतिहासिक स्थळांची शैक्षणिक सहल मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आली होती. या सहलीसाठी शाळेचे अध्यक्ष श्री. गोपाल अग्रवाल सर यांनी सहमती दिली होती. सहल प्राचार्यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीपणे पार पडली.


सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी प्रथम बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध जाळीच्या देवाचे भक्तिभावाने दर्शन घेतले. त्यानंतर विद्यार्थ्यांचा प्रवास अजिंठा–वेरूळकडे सुरू झाला. बसमधील प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांनी गाणी, खेळ, कोडी, प्रश्नमंजुषा अशा विविध उपक्रमांचा आनंद घेतला. मुलांनी एकमेकांशी गप्पा मारत, हसत-खेळत प्रवासाचा मनसोक्त आनंद लुटला.


सहलीच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांनी अजिंठा व वेरूळ येथील गुंफांचे बारकाईने निरीक्षण केले. प्राचीन शिल्पकला, भित्तीचित्रे आणि भारतीय इतिहासाबाबत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. या प्रत्यक्ष अनुभवामुळे विद्यार्थ्यांचे ज्ञान अधिक समृद्ध झाले.


सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी एकत्र बसून भोजनाचा आनंद घेतला. सर्वांनी आपापसात जेवण वाटून घेत सहलीचा आनंद द्विगुणित केला. जेवणानंतर विविध खेळ खेळण्यात आले, छायाचित्रे काढण्यात आली आणि आठवणी जपल्या गेल्या. मुलांनी या सहलीतील प्रत्येक क्षण मनापासून अनुभवला.


या सहलीत इयत्ता दुसरी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांसोबत शिक्षक पायल मॅडम, अश्विनी मॅडम, शिवाजी सर,विशाल सर तसेच सुरेखा ताई उपस्थित होते. सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांची काळजी घेत शिस्त व सुरक्षिततेची विशेष दक्षता घेतली. 

तसेच नववीच्या मुलांनी जबाबदारी सांभाळून छोट्या मुलांची काळजी घेतली व शिक्षकांना सहकार्य केले.                                                                                                       ☀️☀️☀️महाराष्ट्र रत्न न्यूज ☀️☀️                          🎤


🎤जाहिरात व बातम्या करिता संपर्क ☀️☀️☀️☀️☀️☀️✍️मुख्य संपादक ✍️पद्माकर धुरंधर☀️☀️☀️☀️☀️☀️☀️📲 7397988080

Post a Comment

0 Comments