☀️खामगाव नगर परिषद निवडणूक करिता वाहतूक रस्त्यामध्ये बदल ☀️
खामगाव -(शिवशंकर कुटे ) खामगाव येथील दिनांक 21.12.2025 रोजी महात्मा गांधी सभागृह, तहसिल कार्यालय, खामगांव जि. बुलढाणा येथे मतमोजणी होणार आहे.
सदर मतमोजणी दरम्यान परिसरात खामगांव शहरातील व आजुबाजुचे खेडयापाडयातील नागरिक, पक्षाचे प्रतिनिधी, कार्यकर्ते हे फार मोठया प्रमाणावर हजर राहणार असुन त्यामुळे वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने खामगाव शहरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविणेबाबत पोलीस अधिक्षक, बुलढाणा यांनी विनंती केली असता अपर जिल्हादंडाधिकारी, बुलढाणा यांनी नगर परिषद निवडणुकीच्या मतमोजणीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरीता तसेच जनतेच्या सुरक्षिततेसाठी व वाहतुकीच्या सुनियमनासाठी खामगांव शहरातील वाहतुक दिनांक 21.12.2025 रोजी सकाळी 07.00 ते 17.00 वाजता पावेतो खालीलप्रमाणे पर्यायी मार्गाने वळविण्याबाबत आदेश पारीत केला आहे
सध्याचा प्रचलित मार्ग 1 पर्यायी मार्ग नांदुरा ते खामगांव 2 नांदुरा ते जयपुर लांडे पुलावरुन खाली उतरुन खामगांव बस स्टैंड दि. 21.12.2025 रोजीचे 07.00 ते 17.00 वा. पर्यंत जलंब ते खामगांव जलंब ते शेगांव मार्गे खामगांव येथे राहणार आहे
सदर आदेशाचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 131 अन्वये उचित कारवाई करण्यात येईल. असे ही आदेशित केले आहे. ☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️🎤 जाहिरात व बातम्या करता संपर्क ☀️☀️☀️☀️☀️☀️✍️ मुख्य संपादक- पद्माकर धुरंधर ☀️☀️☀️☀️☀️☀️📲7397988080
☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️
Post a Comment
0 Comments