*
जागतिक दिव्यांग दिनाचा कार्यक्रम संपन्न*
🌟🌟आपले सर्व अधिकार मिळविण्यासाठी प्रयत्नरत रहा,, 🌟🌟प्रा.दिक्षाताई दिंडे.🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐
वकील डॉक्टरसह अनेक क्षेत्रांमध्ये दिव्यांग बांधव सर्वोच्च पदावर कार्यरत.. ज्येष्ठ संपादक जगदीशजी अग्रवाल
खामगाव--
( शिवशंकर कुटे)
जागतिक अपंग दिवसाचे औचित्य साधत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विराट मल्टिपर्पज फाउंडेशन खामगाव च्या वतीने जागतिक अपंग दिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षपदी लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे महाराष्ट्र राज्य संघटक जेष्ठ संपादक जगदीशजी अग्रवाल हे होते तर प्रमुख मुख्य अतिथी म्हणून दिव्यांगत्वावर मात करीत संपूर्ण राज्यात दिव्यांगना वास्तविक दिशा देणाऱ्या प्रा दिशा दींडे तसेच शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित दिव्यांग आंतरराष्ट्रीय खेळाडू बुलढाणा जिल्हा सहाय्य क्रीडा अधिकारी अनुराधा सोळंके खामगाव प्रेस क्लब अध्यक्ष किशोर भोसले, लोक स्वतंत्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संभाजीराव टाले विराट मल्टीपर्पज फाउंडेशन अध्यक्ष मनोज नगरनाईक प्रहार शहराध्यक्ष शत्रुघ्न इंगळे हे होते
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जगदीश अग्रवाल यांनी आपले अध्यक्ष भाषणात सांगितले की अपंग बांधव कुठेही मागे नाही आमच्या शहरात दिव्यांग असूनही काही वकील व डॉक्टर टॉप वरती आहे अनेक क्षेत्रांमध्ये दिव्यांग बांधव उच्च पदावर कार्यरत आहे कोणत्याही क्षेत्रात ते मागे नाही तर दिव्यांग बांधवांना दिशा दिंडे पुणे यांनी मौलिक मार्गदर्शन व आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की अपंग व्यक्ती ने स्वतःला कमी न लेखता आपण आपले ध्येय गाठण्यासाठी अविरत प्रयत्नरत राहिले पाहिजे आपण आपल्या मध्ये विविध कलागुण आत्मसात करीत स्वतःसह आपल्या परिवाराचा विकास साध्य कसा होईल यासाठी प्रयत्नशील राहावे त्यांनी सहा देशात वास्तव्य केले याचा अनुभव सुद्धा सांगितला तसेच सध्या संपूर्ण राज्यामध्ये दिव्यांग विकासाकरिता प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय व महाविद्यालय मध्ये भेटी देऊन असलेल्या अडचणी व त्यांच्या समस्या निकाली काढण्याचे कार्य त्या करीत आहे सध्या त्यांनी १८ जिल्ह्यात जवळपास साडेसहा हजार किलोमीटरचा प्रवास व त्याचे वर्णनही त्यांनी यावेळी केले तर आंतरराष्ट्रीय तलवारबाजी खेळाडू बु. जि. क्रीडा सहायक अधिकारी अनुराधा सोळंके यांनी आपल्या मनोगतमध्ये सांगितले की हलाखीची परिस्थिती पासून सुरू केलेला प्रवास प्रचंड इच्छा शक्तीच्या जोरावर क्रीडा क्षेत्रामध्ये आपली छाप उमटवली व आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून 37 वी रँक प्राप्त केली आहे त्या क्रीडा क्षेत्रामधूनच मला दिव्यांगत्वावर मात करीत असंख्य पुरस्कार पारितोषिके प्राप्त केले आज सरकारच्या माध्यमातून दिव्यांगासह सर्वसामान्य खेळाडू करिता कार्यरत आहे किशोर आप्पा भोसले यांनी विराट मल्टीपर्पज फाउंडेशन च्या वतीनं सातत्याने दिव्यांग बांधवांसाठी जे कार्य केल्या जात आहे ते कार्य अभिमानास्पद आहे संभाजीराव टाले यांनी आपले विचार मांडताना सांगितले की दिव्यांग बांधव कुठे कोणताही रोजगार करून स्वाभिमानाने जीवन जगत आहे तर संस्थेचे अध्यक्ष मनोज नगर नाईक यांनी आपले प्रखर विचार मांडताना सांगितले सरकारने एसटी महामंडळातील शिवाई सह वातनुकुलित बस मध्ये इतर सर्वांना आरक्षण लागू केले आहे परंतु यामध्ये आमच्या दिव्यांग घटकाला मात्र नाही ते का नाही ते दिल्यास गेले पाहिजेत तसेच राज्य सरकारच्या ग्रामविकास मध्ये कर सवलत ५०% आहे परंतु शहरी भागातील नगर विकास विभागामध्ये सवलत नाही ती शहरी दिव्यांगाना सवलत देण्यात आलीच पाहिजे यासह अनेक मागणी यांसाठी आम्ही आता लढा लढणार आहे.
यासाठी परिवहन मंत्री व नगर विकास मंत्री यांच्याकडे आम्ही दिव्यांग बांधव पाठपुरावा करून व आपली मागणी शासन दरबारी लावून ती यशस्वीपणे पदरात पाडून घेऊ
तर यावेळी संस्थेच्या कार्यासाठी महिला आघाडीच्या बुलढाणा जिल्हा अध्यक्षा म्हणून कविताताई इंगळे तर अकोला जिल्हाध्यक्ष सौ संध्याताई ताथोड शेगाव तालुकाध्यक्ष चंदाताई दादगल यांची नियुक्ती करण्यात आली
कार्यक्रमाचे बहारदार
सूत्रसंचालन
मिलिंद मधूपवार सर
आभार प्रदर्शन प्रहार शहराध्यक्ष -शत्रूघून इंगळे
यांनी केले यावेळी पत्रकार मुन्ना सरकटे पद्माकर धुरंधर शेखर तायडे राजेश घाटे गणेश लहामगे सुरेंद्र चव्हाण विकी वानखडे वसंता चिखलकर सतीश गोतमारे तानाजी तांगडे मधुकर पाटील दिलीप गांधी कविताताई इंगळेताई,देवगिरीकर चंदाताई दादगळ संध्याताई ताथोड पल्लवीताई पाटील यांच्यासह संस्थेच्या सर्व सभासदांनी अथक परिश्रम घेतले. ⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🎤🎤🎤जाहिरात व बातम्या करिता संपर्क ☀️☀️☀️☀️☀️☀️✍️ संपादक --पद्माकर धुरंधर ☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️

Post a Comment
0 Comments