Type Here to Get Search Results !

**जळंब ठाणेदार अमोल सांगळे साहेब यांनी घेतली पोलीस मित्र मंडळाची बैठक**


 **आमसरी येथे पोलीस मित्र मंडळ बैठक संपन्न.**                                                                                                     **तालुका,-खामगाव प्रतिनिधी-(शिवशंकर कुटे)**                                                                                                            आमसरी येथे हनुमान मंदिरात पोलीस मित्र मंडळ बैठकिचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास जलंब पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री अमोल सांगळे साहेब यांनी मार्गदर्शन केले त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की गावाचे संरक्षण कसे करावे गावात चोऱ्या होऊ नयेत त्याकरता काय उपाययोजना कराव्यात यांचे चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेत रात्रीची गस्त करताना पोलीस मित्रांनी कशाप्रकारे गस्त करावी सोबत टॉर्च काठी ठेवावी काही आढळल्यास आपले दुसरीकडील सोबती यांना सुद्धा माहिती करून द्यावी. त्याचसोबत गावातील वातावरण कसे शांत राहील यांचे पण मार्गदर्शन केले. थोड्या थोड्या गोष्टी वरती वाद करू नये त्या वादाचे नंतर आपल्याला भरपूर त्रास भोगावा लागतो याची सुद्धा त्यांनी जाणीव करून दिली. तसेच एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या मुलांना त्यांनी कसा अभ्यास करावा कोणते वृत्तपत्र वाचावे कोणते मासिक वाचावे आणि क्लास कोणत्या शिक्षणाकडे लावावे कमी खर्चात आपण चांगला अभ्यास कसा होईल यांचे सुद्धा मार्गदर्शन केले. तसेच शेतकरी लोकांना शेती विषयक अनुदानाची माहिती देण्यात आली. दुग्ध व्यवसाय करून आपण कशी पैसे कमवू शकतो याची पण साहेबांनी थोडक्यात माहिती दिली. या कार्यक्रमाला गावातील पोलीस मित्र मंडळाचे सर्व लोक हजर होते तसेच गावातील शेतकरी युवा वर्ग मार्गदर्शन ऐकण्यास हजर होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस पाटील यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन भास्कर कुटे यांनी केले.                           .                                                                                              🌄जाहिरात व बातम्या करिता संपर्क 🌄🌄🌄✍️ मुख्य संपादक ✍️ 🌄🌄🌄🌄🌅पद्माकर धुरंधर🌅🌅🌅🌅🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄📱.7397988080 🌄🌄🌄🌄🌄📱9850434880 🌄🌄🌄🌄 🌄🌄🌄महाराष्ट्र रत्न न्यूज जन सामान्य लोकांचा आवाज 🌅🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄

Post a Comment

0 Comments