***16000 रुपये पुरवठा निरीक्षक पुनम थोरात लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात***
नांदुरा.
(शिवशंकर कुटे)
. नांदुरा तहसीलच्या वादग्रस्त पुरवठा निरीक्षक पुनम थोरात यांना लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने कार्यवाही करीत अटक केली आहे. रेशनच्या दुकानावरील होत असलेली कारवाई थांबविण्यासाठी पुरवठा निरीक्षक पुनम थोरात यांनी लाच मागितली होती.
आज धडक कारवाईच्या उद्देशाने
एसबीच्या पथकाने सापळा रचून नांदुरा पुरवठा निरीक्षक पुनम थोरात यांना 16 हजारांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास एसीबीचे पथक करीत आहे.१६,००० रुपये
घटना तारीख
१८.११:२०२५
थोडक्यात हकीकत-यातील तक्रारदार यांचे चूलते यांच्या नावावर स्वस्त धान्य दुकान असून ते
स्वस्त धान्य दुकान तक्रारदार चालवितात. सदर स्वस्त धान्य दुकानाची दि.२९.१०.२०२५ रोजी तपासणी पुरवठा अधिकारी नांदुरा यांनी केली होती नमुद तपासणी अहवालात काही त्रुटी न दाखविता सदरचा अहवाल तक्रार दार यांचे बाजूने जिल्हा पुरवठा अधिकारी पाठविण्यासाठी तसेच स्वस्त धान्य दुकान सुरळीत चालू ठेवण्यासाठी लोकसेवक श्रीमती पूनम थोरात पद पुरवठा निरीक्षण अधिकारी, नांदुरा हया १६,०००/-हजार रुपये लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलढाणा घटकाकडे प्राप्त झाली होती.
त्यानुसार आज दिनांक १४,११,२०२५ रोजी प्राप्त तक्रारीनुसार आयोजीत पडताळणी कार्यवाही दरम्यान लोकसेवक श्रीमती पुनम थोरात पद पुरवठा निरीक्षण अधिकारी नादुरा यांनी तक्रारदार यांचेकडे तक्रारदार चालवित असलेल्या स्वस्त धान्य दुकानाचा तपासणी अहवालात काही कुटी न दाखविता तक्रारदार यांचे बाजुने त्यांचे वरिष्ठ कार्यालयात अहवाल पाठविण्यासाठी व त्यांचे दुकानाचा स्वस्त धान्य पुरवठा सुरळीत मालू ठेवण्यासाठी 16,000/- रूपये लाचेची मागणी करून लाचेची रक्कम आजच घेऊन येण्यास सांगीतले. त्यानुसार आज रोजी तहसिल कार्यालय, नांदुरा येथे आयोजीत सापळा कार्यवाही दरम्यान नांदुरा तहसिल कार्यालयामधील पुरवठा निरीक्षण अधिकारी यांचे दालनामध्ये तक्रारदार यांचेकडून १६,०००/- रूपये लाचेची रक्कम स्विकारतांना आलोसे श्रीमती पुनम थोरात, पुरवठा निरीक्षण अधिकारी यांना रंगेहात पकडण्यात आले त्यावरुन आलोसे श्रीमती पुनम थोरात यांचेविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदर कार्यवाही
१. मा.श्री बापू बांगर, पोलीस अधिक्षक, अँटी करप्शन ब्यूरो, अमरावती, परिक्षेत्र अमरावती
मो.नं.९०११३२३४२६
२.मा.श्री. सचिन्द्र शिंदे, अप्पर पोलीस अधिक्षक, अँटी करप्शन ब्यूरो, अमरावती, परिक्षेत्र अमरावती
मो.म.९७६४२१०४८५
३ मा श्री भागोजी चोरमले, पोलीस उपअधिक्षक अॅन्टी करप्शन ब्यूरो, बुलढाणा
मो.नं.९५५२५२०१८८
यांचे मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी श्री रमेश पवार, पोलीस निरीक्षक व पोहेको प्रविण बैरागी,. अमोल शिने, पो.ना.जगदीश पवार, पोकों रंजीत व्यवहारे, म.पो. स्वाती वाणी, चापोहेका नितीन शेटे, सर्व अॅन्टी करप्शन ब्यूरो, बुलडाणा यांनी पार पाडली
शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत अॅन्टी करप्शन ब्युरो बुलडाणा येथे दुर. क्रमांक ०७२६२-२४२५४८ व व्हाट्सअप क्रमांक ९४०५०९१०६४ तसेच टोल फ्री क्रंमाक १०६४ यावर संपर्क साधून तक्रार करण्याचे आवाहन पोलीस उपअधिक्षक, अंन्ट्री करप्शन ब्युरो, बुलडाणा यांनी केले आहे. 🌄🌄 मुख्य संपादक -पद्माकर धुरंधर जाहिरात व बातम्या करता संपर्क 🌄🌄📱७३९७९८८०८० ..


Post a Comment
0 Comments