Type Here to Get Search Results !

उपविभागीय कार्यालयात पुरी साहेबा समोर टाकली कोम आलेली कपासाची बोन्डे


 खामगाव ता. (प्रतिनिधी)                                        उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी साहेब यांना शेतकऱ्यांचे निवेदन तर तहसीलदार यांच्यासमोर चक्क शेतकऱ्यांनी टाकली कुजलेली व कोम आलेली कपाशीची बोंडे,तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांचे मागणी.


खामगाव तालुक्यातील पाळा,शिराळा,लोखंडा नायदेवी,घारोळ, निरोळ,गणेशपुर वझर या गावामध्ये २५ ऑक्टोंबर ते २ नोव्हेंबर या ८ दिवसाच्या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी मेटाकुटीस आला आहे.

शासनाने याची तात्काळ दखल घेत झालेल्या नुकसान बाबत तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी आग्रही मागणी शेतकरी बांधवांनी धरली व बोंडे तहसीलदार यांच्या समोर टाकत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचा आग्रह धरला परंतु तहसीलदार यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी यांची भेट घेऊन निवेदनातून आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडली शेतकऱ्यापर्ती नेहमीच आपुलकीची भावना असलेले उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी साहेब यांनी तात्काळ संबंधित विभागाला पत्र फॉरवर्ड करून पंचनामे करण्याची सूचना केल्या.

तालुक्यात अतिवृष्टी या अनपेक्षित नैसर्गिक आपत्तीमुळे कपाशीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पीक खाली पडले तसेच कापसाला कोम व बोंड पडून सडले असून शेतकऱ्यांच्या आता तोंडाशी आलेल्या घास पावसाने हिरावून नेला आहे. शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचून तळे निर्माण झाले आहेत.

त्यातच सप्टेंबर मध्ये जो वादळी पाऊस झाला होता त्या तुटपुंची मदत शेतकऱ्यांना मिळाली आहे शेकडो शेतकऱ्यांची पीक विमा काढूनही बदललेल्या निकर्षामुळे शेतकरी बांधव साधी तक्रार सुद्धा करू शकत नाही शेतकऱ्यांचा हक्काच्या पिक विमा मिळेल किंवा नाही याची सुद्धा खात्री नाही त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात त्रस्त झाला आहे.

विशेष पाळा,शिराळा, लोखंडा,नायदेवी,निरोड, घारोड,गणेशपुर वझर या गावांमध्ये कपाशीचा पेरा 90% आहे शेतकऱ्यांना या आपत्तीच्या सर्वाधिक फटका बसला आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवस्था गंभीर झाली आहे. शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन होता नव्हता पैसा सुद्धा शेती पिकाला लावला असून आता शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे तरी शेतकऱ्यांना तातडीने पंचनामे करून हेक्टरी 50 हजार रुपये शासकीय मदत द्यावी अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे.

निवेदन देतेवेळी उपस्थित शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे शिवसेना उप तालुकाप्रमुख संतोष धोंडीबा सातव,सुनील रामचंद्र गाढवे,संदीप सातव,कृष्णा गावडे, संतोष सांगळे,राधाकृष्ण गाढवे, गजानन आरवाडे,शेख जावेद,ज्ञानेश्वर सांगळे,उमेश सांगळे,भास्कर इंगळे,विजय इंगळे,विभाग प्रमुख नामदेव टाले,शिवसेना विभाग प्रमुख लक्ष्मण काकडे, शिवसेना विभाग प्रमुख चेतन शलकर,शैलेंद्र चव्हाण अमोल जाधव,धम्मपाल गवई व इतर शेतकरी उपस्थित होते.                                                                                                                                                                      🌄जाहिरात व बातम्या करिता संपर्क 🌄🌄🌄✍️ मुख्य संपादक ✍️ 🌄🌄🌄🌄🌅पद्माकर धुरंधर🌅🌅🌅🌅🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄📱.7397988080 🌄🌄🌄🌄🌄📱9850434880 🌄🌄🌄🌄 🌄🌄🌄महाराष्ट्र रत्न न्यूज जन सामान्य लोकांचा आवाज 🌅🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄

Post a Comment

0 Comments