Type Here to Get Search Results !

खामगाव ता. शिवासेना महिला आधाडी कडून केली भाऊबीज साजरी


 ***शिवसेना महिला आघाडी कडून भाऊबीज साजरी***

खामगाव ता. प्रतिनिधी.

तालुकाप्रमुख जयश्रीताई देशमुख यांनी केले केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे औक्षण.

खामगाव तालुका शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने भाऊबीज हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.बुलढाणा जिल्ह्याचे खासदार तसेच देशाचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यासोबत महिला आघाडी भाऊबीज साजरी केली यावेळी तालुकाप्रमुख जयश्रीताई देशमुख यांनी मंत्री प्रतापराव जाधव व जिल्हा प्रमुख संतोष डिवरे शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र बघे शहर प्रमुख चेतन ठोबरे यांचे औक्षण केले. आगामी निवडणूकच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट खामगाव तालुक्याची बैठक दिनांक 27 ऑक्टोबर रोजी हॉटेल तुळजाई येथे आयोजित करण्यात आली होती.यावेळी महिला आघाडी कडून केंद्रीय मंत्री तसेच शिवसेना पदाधिकाऱ्यासोबत भाऊबीज साजरी करण्यात आली.यावेळी महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना कार्यकर्त्याचे व पदाधिकाऱ्यांचे औक्षण केले.यावेळी उपजिल्हाप्रमुख कावेरी ताई वाघमारे ,तालुका प्रमुख जयश्रीताई देशमुख, शहर प्रमुख वैशालीताई घोरपडे , निर्मला ताई हेलोडे, श्वेता पाटील ,ज्योती बुजाडे आदी महिला आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.                                                                                                           🌄 जाहिरात व बातम्याकरिता संपर्क 🌄                                  🌄मुख्य संपादक- पद्माकर धुरंधर 🌄📱                                    7397988080 /9850434880

Post a Comment

0 Comments