Type Here to Get Search Results !

नांदुरा नगर परिषद कुणाकडे

 




 **सामान्य जनतेची कामे करणारा  ठरवणार नांदुरा नगरपरिषदवर  काँग्रेसचा की भाजपाचा झेंडा.**.                                             नांदुरा-प्रतिनिधी

 🌄नांदुरा नगर परिषदे वर काँग्रेसचा की भाजपाचा झेंडा🌄




 जनसामान्यांची कामे करणाररी व्यक्ती ची उमेदवारी ठरवणार .


२०२५ ची होऊ घातलेली नांदुरा नगर परिषद निवडणूक नांदुरे करां साठी फक्त सत्ता मिळवण्याची नव्हे, तर प्रतिष्ठेची लढत होणार असल्याचे सध्यातरी दिसून येत आहे . काँग्रेससाठी ही निवडणूक 'सत्ता टिकवण्याची लढत' ठरणारआहे, तर भाजपसाठी 'सत्ता काबीज करण्याची तयारी दिसून येत आहे परंतु. शेवटी, उमेदवारीचा निर्णय आणि गटबाजीवर नियंत्रण या दोन गोष्टीच नांदुरा न प च्या राजकारणाचा भविष्यकालीन भाजपा कि काँग्रेस ठरवतील.


नवीन प्रभाग रचनेनुसार नांदुरा नगर परिषदेत आता 12 प्रभाग आणि 25 नगरसेवकांची जागा निश्चित झाली आहे. या रचनेमुळे राजकीय समीकरणे नव्याने बनणार हे जवळपास निश्चित आहे. नांदुरा नगर परिषद ही परंपरेने भाजप आणि काँग्रेसचा गड मानली जाते. स्थानिक नेतृत्व, जातीय संतुलन आणि सामाजिक संवाद या तीन आधारांवर काँग्रेसने आणि भाजपने थोड्याफार प्रमाणात अनेक वर्षे सत्ता राखली आहे. परंतु यावेळी परिस्थिती थोडी वेगळी आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून तीव्र रस्सीखेच हे जवळपास निश्चित आहे . गटबाजी आणि अंतर्गत मतभेद उघडपणे होऊ शकतात . काही स्वतःला दिग्गज नेते समजतात अशांना उमेदवारी न मिळाल्यास त्यांची नाराजी काँग्रेससाठी घातक ठरू शकते, अशी भीती पक्षांतर्गत व्यक्त होत आहे. उमेदवारीपासून - वंचित राहिलेले काही महत्त्वाकांक्षी नगरसेवक आणि माजी नगराध्यक्ष ऐनवेळी भाजपकडे झुकू शकतात, अशा कोणत्याही हालचालीमुळे काँग्रेसच्या पारंपरिक मतांमध्ये फूट पडण्याचा धोका नाकारता येत नाही. तर भाजपने या निवडणुकीकडे अत्यंतबारीक राजांनीतिक नजरेने पाहायला सुरुवात केली आहे. भाजप प्रदेश उपाध्यक्ष आणि आमदार चैनसुख संचेती यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड चैतन्य दिसत आहे. केव्हा काँग्रेसमधील नाराज नेत्यांचा लाभ घेऊन नगर परिषदेत सत्ता मिळवणे, असेही भाजपाचे लक्ष्य असू शकते. काँग्रेसचे काही बोटावर मोजण्या इतपत नेते भाजपाच्या संपर्काँत असल्याचेही दिसून येत आहे काँग्रेसची संघटनात्मक ताकद गटबाजीमुळे ढासळल्यास, त्याचा फायदा भाजप घेऊन आपले संख्याबळ वाढवू शकते . अशा वेळी काही अपक्ष नगरसेवकांची साथ मिळाली, तर भाजप सहजपणे सत्ता स्थापना डंके की चोट वर करेल. एकूण आपल्याला असे दिसून येत आहे की नांदुरा नगर परिषदेची उमेदवारीचे गणितच राजकीय बदलाला निर्णायक ठरवणार आहेत. हे जवळपास निश्चित आहे परंतु कोणाला उमेदवारी मिळते यावर हे सर्व अवलंबून आहे तो उमेदवार कसा आहे हेच महत्त्वाचे ठरणार  .


काँग्रेसने जर गटसंतुलन आणि सामाजिक समीकरण विचारात घेऊन योग्य उमेदवार उभे केले , तर सत्ता राखण्याची शक्यता मोठी आहे. पण अंतर्गत मतभेद, अहंभाव आणि नाराजी वाढली, तर ती थेट भाजपाच्या फायद्याची चाल ठरू शकते. एकतर्फी भाजपची सत्ता न. पा.येऊ शकते हे विसरून कसं चालेल यदाकदाचचित काँग्रेसने , पारंपरिक मतदारांच्या बळावर सत्ता टिकवणे आतातरी शक्यता कमी आहे. असे समजून चालणार नाही परंतु जर गटबाजी, नाराजी आणि स्वार्थी राजकारणाचा अतिरेक झाला, तर भाजपा नगर परिषदेत सत्ता मिळवण्याच्या जवळ पोहोचू शकतो. 2025 ची न प निवडणुकीत निकाल ठरवणारे घटक गणित नाही, तर राजकीय मानसशास्त्र असेल अर्थात कोण मतदारांच्या भावनेशी जोडतो आणि कोण आपल्या गटाला एकसंघ ठेवतो, मतदार कोणाच्या आश्वासनावर विश्वास ठेवतो आणि मागील पाच वर्षात कोणी काय केले आज रोजी काँग्रेस कोणत्या नेत्याच्या शब्दावर निवडणूक लढवेल आणि मतदार त्याचे शब्द ऐकतील असे तरी गणित सध्या नांदुरा नगरीत नाही तेव्हा निर्णयक मते घेऊन नांदुरा न प ची निवडणूक लढवून सत्ता काबीज करण्याची 'काँग्रेसची कसोटी' लागणार असूनआणि सत्ता हस्तगत करण्याची भारतीय जनता पार्टीची ही संधी म्हणजे दोघांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक म्हणावी लागेल सध्या नांदुरा न प मध्ये भाजपाची सत्ता येण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते मागील एक ते दीड महिन्यापासून शहरातील सामाजिक धार्मिक आणि वैयक्तिक भेटीवर त्यांनी जोर दिला असून नांदुरा शहरामध्ये भाजपमय वातावरण करण्यासाठी एकही संधी सोडत नसल्याचे दिसून आलेले आहे. दोन्ही पक्षांना ही निवडणूक सोपी जाणार नाही योग्य उमेदवारच निवडणुकीचा कौल देतील.                                                                                                      🌄🌄🌄जाहिरात व बातम्या करिता संपर्क 🌄🌄🌄🌄🌄🌄🌄✍️ 🌄मुख्य संपादक🌄 ✍️ 🌄         🌄🌄🌄🌄✍️✍️🌄🌄🌄🌅पद्माकर धुरंधर🌅🌅🌅🌅🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄📱.7397988080 🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄📱9850434880 🌄🌄🌄🌄 🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄महाराष्ट्र रत्न न्यूज जन सामान्य लोकांचा आवाज 🌅🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌅🌅🌅🌅🌄🌄🌄🌄🌄

Post a Comment

0 Comments