Type Here to Get Search Results !

☀️ नांदुरा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक नांदुरावर आरबीआय ने केली कारवाई ☀️

 ☀️☀️नांदुरा अर्बन को-ऑपरेटिव बँक नांदुरा वर RBI ने केली कार्यवाही☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️




नांदुरा:-

(शिवशंकर कुटे) -----=----=------=-           

                     

 भारतीय रिझर्व्ह बँक च्या कार्यवाही ने कार्यवाही करत नांदुरा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुख्य शाखा नादुरा अर्बन को-ऑपरेटिव बँकेवर थेट कारवाई करत एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. 

आरबीआयने १३ जानेवारी २०२६ रोजी हा आदेश जारी केला असून, बँकिंग नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बँक व्यवस्थापनावर हा स्पष्ट इशारा मानला जात आहे. 

बँकिंग नियमन कायदा १९४९ च्या सेक्शन ४६ (४) () व ५६ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. आरबीआयने ३१ मार्च २०२५ रोजी बँकेच्या आर्थिक स्थितीचे सखोल परीक्षण केले असता, नांदुरा अर्बन बँकेने आरबीआयच्या महत्त्वाच्या सूचनांचे पालन न केल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे, बँकेने नाममात्र सदस्यांना नियमबाह्य व मर्यादेपेक्षा जास्त कर्ज मंजूर केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आरबीआयने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र बँकेकडून सादर करण्यात आलेली कारणे समाधानकारक नसून, त्रुटी कायम असल्याचे

स्पष्ट झाले. त्यामुळे आरबीआयने दंडात्मक कारवाई करत बँक व्यवस्थापनाला धडा शिकवला आहे. दरम्यान, ही कारवाई केवळ आर्थिक दंडापुरती मर्यादित असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे. मात्र, नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सहकारी बँकांवर आरबीआयची नजर अधिक तीव्र झाल्याचे संकेत या कारवाईतून मिळत आहे.                       -------------------- महाराष्ट्र रत्न न्यूज --------=----------- -----------------------जाहिरात व बातम्या करिता संपर्क, ---=-------=------=--- ✍️मुख्य संपादक:-                                                       ✍️पद्माकर धुरंधर ---------------------          ----------------📲7397988080---------------------------☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️

Post a Comment

0 Comments