Type Here to Get Search Results !

☀️ राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज समाजभूषण पुरस्काराने डॉक्टर ऋषिकेश भाऊ उन्हाळे सन्मानित ☀️

 ☀️राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज समाजभूषण पुरस्काराने डॉक्टर ऋषी भाऊ उन्हाळे सन्मानित ☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️  ☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️खामगाव :- (शिवशंकर कुटे)           ☀️☀️☀️☀️☀️☀️डॉ.ऋषिकेश गजाननराव उन्हाळे यांना वैदर्भीयनाथ चॅरिटेबल ट्रस्ट, कारंजा (लाड), जिल्हा वाशिम यांच्या वतीने १८ जानेवारी २०२६ मध्ये आयोजित द्वितीय राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात समाजसेवेत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल “छत्रपती शिवाजी महाराज समाजभूषण पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे.

“सेवाभाव कर्तृत्वाचा – सोहळा कौतुकाचा” या ब्रीदवाक्यानुसार गेल्या अनेक वर्षांपासून वैदर्भीयनाथ चॅरिटेबल ट्रस्ट सामाजिक, शैक्षणिक व मानवतावादी उपक्रमांत सातत्याने कार्यरत आहे. समाजात प्रेरणादायी कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्याची परंपरा ट्रस्टने जपली असून, त्याच परंपरेत यंदा डॉ. ऋषिकेशभाऊ उन्हाळे यांची निवड करण्यात आली आहे.

डॉ. ऋषिकेशभाऊ उन्हाळे यांनी सामाजिक सलोखा वृद्धिंगत करणे, गरिबांसाठी मदतकार्य, युवक प्रबोधन तसेच विविध सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभाग घेऊन समाजासाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ट्रस्टने त्यांची राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कारासाठी निवड केली आहे.

हा पुरस्कार सोहळा कारंजा (लाड), जिल्हा वाशिम येथे पार पडणार आहे. ट्रस्टचे सचिव श्री. एकनाथ पवार यांनी डॉ. उन्हाळे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आ. सईताई प्रकाशदादा डहाके (कारंजा/मनोरा विधानसभा क्षेत्र), आ. श्री. हरिषजी पिंपळे (मुर्तिजापूर विधानसभा क्षेत्र), श्रीकांत देशपांडे (माजी आमदार, विधानपरिषद), पुंडलीक गोसावी, दिलीप टीकडे, विजय तेलगोटे, ओंकार मालवळकर, शारदाताई भुयार, आशाताई मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.

या सन्मानामुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून विविध स्तरांतून डॉ. ऋषिकेशभाऊ उन्हाळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या कार्यामुळे समाजातील तरुणांना नवी प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. ☀️☀️☀️☀️ ☀️महाराष्ट्र रत्न न्यूज ☀️ ☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️ ☀️🎤जाहिरात व बातम्या करिता संपर्क ☀️☀️☀️ ☀️☀️☀️✍️मुख्यसंपादक :- ✍️पद्माकर धुरंधर ☀️☀️☀️☀️☀️☀️📲7397988080☀️☀️☀️☀️☀️☀️☀️


Post a Comment

0 Comments