Type Here to Get Search Results !

खामगाव नगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर : शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे साहेब व केंद्रीय मंत्री मा.ना. प्रतापराव जाधव साहेब यांची भेट.. शिवसेना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अश्विनी माळवंदे नगरअध्यक्ष पदाचे उमेदवार तसेच शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र बघे यांची उपस्थिती*

 *खामगाव नगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर : शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे साहेब व केंद्रीय मंत्री मा.ना. प्रतापराव जाधव साहेब यांची भेट.. शिवसेना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अश्विनी माळवंदे नगरअध्यक्ष पदाचे उमेदवार तसेच शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र बघे यांची उपस्थिती*


(प्रतिनिधी-खामगाव)

राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्या मातृतीर्थ भूमी सिंदखेडराजा येथे शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी खामगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे शिवसेनेच्या उमेदवार अश्विनी माळवंदे व नगरसेवक पदाचे उमेदवार पुष्पा बाई ठोंबरे ,ज्योती ताई देवताडू,अंकिता ताई कळमकार,श्याम गायकवाड,निर्मला बाई हेलोडे,यांनी भेट घेतली. 


केंद्रीय मंत्री मा.ना.प्रतापराव जाधव साहेब २९/३० नोव्हेंबरला खामगावात.


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी लाडक्या उमेदवार बहिणीला व भावाला शुभेच्छा दिल्या.


अश्विनी माळवंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना गोमातेची सुंदर मूर्ती भेट दिली आहे.

या भेटी दरम्यान शिंदे यांनी माळवंदे यांच्या स्वच्छ प्रतिमेचे आणि उच्चशिक्षित पार्श्वभूमीचे कौतुक करताना खामगाव नगरपालिका ताकतीनशी लढवा मी तुमच्या पाठीशी खंबीरपणा उभे आहे असे ठामपणे विश्वास दिला.


यावेळी शिवसेना पदाधिकारी व उमेदवारांनी मित्र पक्षाकडून शिवसेना उमेदवार होत असलेला नाहक त्रासाबद्दल शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे तक्रार सुद्धा केलेली आहे.


त्यामध्ये मित्र पक्षाकडून दबाव तंत्राचा वापर करून जातीपातीचा राजकारण करून उमेदवारी माघारी घेण्याकरिता पेटी बंद करण्याकरिता समर्थन देण्याकरिता अत्यंत केविलवाना प्रयत्न चालू आहे ते सुद्धा प्रामुख्याने शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना सांगितले.


शिवसेनेचा भगवा झेंडा फडकावण्याची ग्वाही यावेळी उमेदवारांनी व कार्यकर्त्यांणी दिली.


एकनाथ शिंदे साहेब यांनी खामगावमध्ये सर्व लाडक्या बहिणीने भावांना धनुष्यबाण समोरील बटन दाबून अश्विनी माळवंदे व शिवसेनेचे सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून अशी आव्हान केले. व हीच केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना खरी वाढदिवसाची भेट असेल,” अशा शब्दांत शिंदे यांनी कार्यकर्ते आणि मतदारांना आवाहन केले.

यावेळी उपस्थित केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब, मा. मंत्री अर्जुनराव खोतकर माजी आमदार शशिकांत खेडेकर,शिवसेना जिल्हाप्रमुख जिल्हाप्रमुख बळीराम मापारी, महिलाकडे जिल्हाप्रमुख मायाताई म्हस्के, सिनखेडराजा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तायडे साहेब,खामगाव तालुका प्रमुख राजेंद्र बघे,रवी माळवंदे,शिवसेना शहर प्रमुख चेतन ठोंबरे युवा सेना शहरप्रमुख राहुल कळमकार माजी युवा सेना उपजिल्हाप्रमुख निलेश देवताडू निर्मला ताई हेलोडे आदी मान्यवर उपस्थित होते.


खामगाव शहरातून मिळालेल्या माहितीनुसार, नगराध्यक्षपदासाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि काँग्रेस यांचे उमेदवार रिंगणात असले तरी अश्विनी माळवंदे यांची स्वच्छ, सुशिक्षित आणि सर्वसामान्यांशी थेट संवाद साधणारी प्रतिमा मतदारांना भावली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात माळवंदे यांचे आव्हान जड जाणार असे चित्र आहे.

शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण असून, “यावेळी खामगावमध्ये धनुष्यबाण निश्चितच विजयी होणार” असा विश्वास व्यक्त होत आहे.

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीने आणि थेट आशीर्वादामुळे शिवसेनेच्या या लढतीला आणखी बळ मिळाले आहे.

खामगाव नगरपालिका निवडणुकीकडे आता संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचे लक्ष लागले असून,पुन्हा एकदा भाजप सत्ता मिळणार की अन्य पक्ष बाजी मारणार,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments