नायलॉन मांजा वापराल तर थेट जेलची हवा खावी लागेल!
बुलढाणा जिल्हा पोलिसांचा कडक इशारा पालकांवरही कारवाई होणार !
खामगाव -:(शिवशंकर कुटे)
तुमची एक चूक ठरू शकते आयुष्यभराची शिक्षा.
बुलढाणा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने देण्यात आला कडक इशारा . मा. पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नायलॉन / चायनीज मांजा बाळगणे, वापरणे, खरेदी-विक्री करणे हा दंडनीय अपराध असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शासनाने या घातक मांजावर पूर्णतः बंदी घातलेली असून, तरीही शहरात काही ठिकाणी त्याचा वापर होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. नायलॉन किंवा चायनीज मांजा हा मानवी जीवन, पक्षी, जनावरे तसेच वाहनचालकांसाठी प्रचंड धोकादायक ठरत असून, अनेक ठिकाणी गंभीर प्रकारच्या जखमा व मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे कोणीही प्रकारचा मांजा ऑनलाईन किंवा दुकानातून खरेदी करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
नायलॉन / चायनीज मांजा खरेदी-विक्री करताना किंवा वापरताना कोणीही आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. अल्पवयीन मुलांकडून नायलॉन किंवा चायनीज मांजाचा वापर आढळून आल्यास, कोणतीही प्रकारचे स्पष्टीकरण न ऐकता थेट पालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे. नायलॉन / चायनीज मांजामुळे मानवी मृत्यू झाल्यास संबंधितांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी ठणकावून सांगितले आहे. या संदर्भात माहिती मिळाल्यास किंवा असा प्रकार आढळून आल्यास त्वरित पोलीस स्टेशन खामगाव येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही माहिती पोलीस निरीक्षक राजू पवार (ठाणेदार), पोलीस स्टेशन खामगाव, जि. बुलढाणा यांनी दिली आहे.☀️☀️☀️☀️ ☀️महाराष्ट्र रत्न न्यूज ☀️☀️☀️☀️☀️☀️🌟🎤🎤🎤🎤जाहिरात व बातम्या करिता संपर्क 🌟🌟🌟✍️✍️✍️✍️ मुख्य संपादक ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️पद्माकर धुरंधर ☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️🌟🌟🌟🌟📲7397988080

Post a Comment
0 Comments