Type Here to Get Search Results !

🌟🌟प्रभाग 11 मध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचा आनंद कीलोलीया व सरस्वतीताई खाचने यांचा प्रचार दौरा.🌟🌟


🌟🌟प्रभाग 11 मध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचा आनंद कीलोलीया व सरस्वतीताई खाचने यांचा प्रचार दौरा.🌟🌟


🌟खामगाव-प्रतिनिधी 🌟


युवा उमेदवार आनंद कीलोलीया व माजी नगराध्यक्ष सरस्वती ताई खाचने यांच्या प्रचाराचा शुभारंभ

माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला

खामगाव नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 11 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवारांचा प्रचार उत्साहात सुरू झाला आहे. युवकांचे आशास्थान आनंद किलोलीया व संपूर्ण शहराचा अभ्यास पूर्ण विकास कशा पद्धतीत करावा याची माहिती असलेल्या माजी नगराध्यक्ष सरस्वती ताई खाचने यांच्या प्रचाराचा शुभारंभ विधीवत करण्यात आला. 

प्रभागाच्या विकासासाठी राष्ट्रवादी पक्षाने सक्षम पर्याय असल्याचा kविश्वास व्यक्त केला. प्रभाग 11 मध्ये मूलभूत सुविधांचे सुदृढीकरण, स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा, तसेच युवांसाठी विविध उपक्रम राबविण्याचे आश्वासनही यावेळी उमेदवारांकडून देण्यात आले.

 वयोवृद्ध आणि ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेत प्रचाराची सुरुवात केली. नागरिकांचा विश्वास मिळणे ही मोठी प्रेरणा असल्याचेही उमेदवारांनी सांगितले. असंख्य कार्यकर्ते उत्साहाने सहभागी झाले होते. अनेक नागरिकांनी उमेदवारांना पाठिंबा दर्शवीत प्रभागाच्या विकासासाठी त्यांच्याकडून सकारात्मक बदलांची अपेक्षा व्यक्त केली.

प्रचाराच्या या उत्साही प्रारंभामुळे प्रभाग क्रमांक 11 मध्ये निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत असून, राष्ट्रवादीची दमदार सुरुवात आपल्या उमेदवारांच्या मजबूत पायाभरणीची विकासाची नांदी दिली आहे.☀️☀️☀️🌟✍️ बातम्या व जाहिराती करता संपर्क 🌟मुख्य संपादक -पद्माकर धुरंधर 📱7397988080🌟🌟

Post a Comment

0 Comments